Arjun Tendulkar poor performance in Vijay Hazare Trophy
esakal
Uttarakhand vs Goa Vijay Hazare Trophy match report: अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा अपयशी ठरला. अर्जुनने गोलंदाजीपेक्षा फलंदाजीत लक्ष केंद्रित करावं, कारण तो सचिन तेंडुलकरसारखा खेळतो, असे विधान योगराज सिंग यांनी केलं होतं. त्यामुळे गोवा संघाने आज लगेच त्याला उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात सलामीला पाठवले. पण त्यांच्या पदरी निराशा झाली. फलंदाजीतील अपयशानंतर गोलंदाजीत तरी तो चांगले योगदान देईल, परंतु तेथेही त्याने स्वतः केलेल्या धावांपेक्षा सातपट अधिक धावा गोलंदाजीत दिल्या. त्यामुळे त्याचा समावेश गोवा संघासाठी चिंतेची बाब बनत चालला आहे.