

Mehendi and Sangeet Ceremony of Arjun Tendulkar and Saaniya Chandhok
Sakal
Arjun Tendulkar and Saaniya Chandhok Wedding Videos: भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो सानिया चांदोक हिच्याशी लग्न करणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यांना मुंबईत सुरुवातही झाली आहे. त्यांचे ५ मार्च रोजी लग्न (Marriage) असल्याचे समजत असून त्याआधी मंगळवारी (३ मार्च) मेंहंदी आणि संगीत सोहळा पार पडला.
यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबिय सजले होते. सर्वांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता. यावेळी अनेक सेलिब्रेटिंनीही हजेरी लावली होती.