Arjun Tendulkar and Saaniya Chandhok’s grand wedding ceremony in Jamnagar
ESAKAL
Arjun Tendulkar and Saaniya Chandhok wedding in Jamnagar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. अर्जुन-सानियाचे लग्न मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि लग्नसोहळ्यासाठी तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबिया जामनगर येथे पोहोचले आहे. रिलायन्स समुहाचे मालक अंबानी यांच्या जामनगर येथील बंगल्यात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सने आज त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि यात अर्जुन व सानिया हे गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.