Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला नवा संघ मिळाला... मुळ किंमतीच्या पाचपट रक्कम; शिवम दुबेसह आता धुमाकूळ घालणार भाई...

Arjun Tendulkar T20 Mumbai League 2026 auction price details: अर्जुन तेंडुलकर याला अखेर नवा संघ मिळाला असून ट्वेंटी-२० मुंबई लीगच्या लिलावात त्याच्यावर पैशांचा वर्षाव झाला. अवघ्या २ लाख रुपयांच्या मुळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या अर्जुनला तब्बल १० लाख रुपये मिळाले, म्हणजेच त्याच्या बेस प्राइसच्या पाचपट रक्कम त्याला मिळाली आहे.
Arjun Tendulkar has been cleared to participate in T20 Mumbai League

Arjun Tendulkar has been cleared to participate in T20 Mumbai League

esakal

Updated on

ARCS Andheri team squad Arjun Tendulkar 2026: महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याला अखेर नवा संघ मिळाला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखौन सुपर जायंट्सकडून अजूनही खेळण्याची संधी न मिळालेल्या अर्जुनवर मुळ किमतीच्या पाचपट बोली लावली गेली. अर्जुनला ट्वेंटी-२० मुंबई लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आणि आज लिलावात त्याच्यावर ARCS Andheri संघाने १० लाखांची यशस्वी बोली लावली. चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू शिवम दुबे ARCS Andheri संघाचा आयकॉन खेळाडू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com