Arshdeep Singh: गोलंदाजांनी कणखर होण्याची गरज; अर्शदीप सिंग, दवात गोलंदाजी करण्यासाठी ओल्या चेंडूवर सराव
T20 World Cup: टी-२० विश्वकरंडकात भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग कणखर होऊन फलंदाजांना बाद करण्यावर भर देतो. ओल्या चेंडूवर सराव करून खेळपट्टीनुसार रणनीती आखतो. बुमरा, सिराज व हार्दिकसह संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सामंजस्य राखत उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न करत आहे.
चेन्नई : या विश्वकरंडक स्पर्धेत भारताची कामगिरी अगदी सर्वोत्तम झालेली नसली तरी सहा पैकी पाच सामने जिंकलो आहोत. संघामधील विश्वास कायम होता. गेल्या काही सामन्यांत खेळपट्टी वेगळी होती. चेन्नईची खेळपट्टी भिन्न होती.