Joe Root smashed his 41st Test century in the Ashes 5th Test at Sydney
esakal
Joe Root chasing Sachin Tendulkar Test hundreds: अॅशेस मालिकेत ०-३ अशा पिछाडीनंतर जाग आलेल्या इंग्लंडने पाचव्या कसोटीत मजबूत सुरुवात केली. चौथी कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघात एक वेगळीच सकारात्मकता दिसली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा त्यांनी मोठ्या हिमतीने सामना केला आणि जो रूट सिडनी कसोटीत आता नायक ठरतोय. पाचव्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला अन् दुसऱ्या दिवशी रूटने धावांचा पाऊस पाडला. त्याने कसोटीतील त्याचे ४१ वे शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग ( Ricky Ponting ) याच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याच्या या सातत्याने सचिन तेंडुलकरच्या फॅन्सची धडधड वाढवली आहे.