Steve Smith Cleans Up with Beauty
esakal
AUS vs ENG fourth Test bowling dominated day: अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. मालिकेत ३-० अशा आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव इंग्लंडने १५२ धावांवर गुंडाळून चांगले पुनरागमन केले. पण, ऑस्ट्रेलियाकडूनही त्यांना सडेतोड उत्तर मिळाले. जलदगती गोलंदाजांना स्विंग व सीम करण्यास मदत करणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजांची तारांबळ उडावी. इंग्लंडच्या जोश टंगने टाकलेल्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथचा ( Steve Smith) उडालेला त्रिफळा चर्चेत राहिला. नेटिझन्सने या चेंडूला झापूक झूपूक असे नाव दिले. सध्या या विकेट्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.