Ashes 2025: पहिल्या दिवशी १९ फलंदाज बाद; ॲशेस कसोटी, इंग्लंड १७२ तर ऑस्ट्रेलिया नऊ बाद १२३
Record-Breaking Day in the Ashes Test: पहिल्याच दिवशी तब्बल १९ विकेट पडून ॲशेस कसोटीत शतकातील विक्रम झाला. इंग्लंडने १७२ नंतरही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व मिळवले. स्टोक्सचा पाच विकेट्सचा कहर आणि स्टार्कची सात विकेट्सची आगडोंब—दोन्ही संघांच्या फलंदाजीची झाली दाणादाण.
पर्थ : ॲशेस कसोटीत गेल्या १०० वर्षांहून अधिक काळात जे घडले नाही, ते यंदा घडले. पहिल्याच दिवशी तब्बल १९ विकेट बाद होण्याचा पराक्रम झाला आणि १७२ धावांत गारद होऊनही इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची अवस्था नऊ बाद १२३ अशी करून वर्चस्व मिळवले.