
आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ उद्या जाहीर होणार आहे.
अजित आगरकर, गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात अंतिम चर्चा सुरू आहे.
आठ खेळाडूंची नावे निश्चित झाली असून सात जणांच्या निवडीवर संभ्रम कायम आहे.
Asia Cup 2025 Team India final squad news : आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ उद्या जाहीर होणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा होणार आहे. आशिया चषक स्पर्धेनंतर लगेचच चार दिवसांनी वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे संघ निवडताना निवड समितीला या गोष्टीचाही विचार करावा लागणार आहे.