
नवी दिल्ली : बहुचर्चित आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आज संघ निवड होत आहे. टी-२० प्रकारात फलंदाजीची रचना जवळपास निश्चित असताना त्यात प्रतिभावान शुभमन गिलला कसे स्थान द्यायचे यावर निवड समितीला खल करावा लागणार आहे. श्रेयस अय्यरबाबतही हाच प्रेचप्रसंग आहे.