Asia Cup 2027 is set to be held in Bangladesh
ESAKAL
Bangladesh to host Asia Cup 2027: आशिया चषक २०२५ स्पर्धेत रंगलेल्या नाट्यानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा चर्चेत आली आहे. वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेची प्रतीक्षा असते, कारण या स्पर्धेच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येतात.. पण, यावेळी ही स्पर्धा आणखी एका कारणाने चर्चेत आली आहे आणि ते म्हणजे बांगलादेशच्या यजमानपदामुळे... बांगलादेश आणि भारत यांच्यातले ताणलेले संबंध पाहता ही स्पर्धा बांगलादेशात होणार नाही असे वाटत होते, परंतु तसे होण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त समोर आले आहे. आता भारतीय संघ बांगलादेशात खेळायला जातो का, याची उत्सुकता आहे.