Asia Cup Semi Final : भारत फायनलमध्ये! बांगलादेशवर दणदणीत विजय, जेतेपदासाठी आता पाकिस्तान येऊ शकतो समोर...

India Reach Final After Crushing Bangladesh: महिला टी20 आशिया कप २०२६ मध्ये भारतीय महिला संघाने दिमाखदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करत भारताने जेतेपदाच्या लढतीतील आपले स्थान पक्के केले.
Women’s T20 Asia Cup

India reach Women’s T20 Asia Cup final after Bangladesh win

esakal

Updated on

India reach Women’s T20 Asia Cup final after Bangladesh win : भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारतीय संघाने आशिया चषक फायनलची परंपरा कायम राखण्यासाठी उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशवर ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. शफाली वर्माने ६४ धावांची खेळी करून प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला. आता अंतिम सामन्यात भारतासमोर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या विजेत्या संघाचा सामना होईल. भारताने साखळी गटात पाकिस्तानला ५५ धावांवर ऑल आऊट करून ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com