Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Asian Games 2026 India Team : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी खेळाडूला दुखापतीमुळे भारताच्या आशियाई क्रीडा मोहिमेतून बाहेर झाला आहे.
Asian Games 2026

Varun Chakravarthy Ruled

Updated on

Varun Chakravarthy injury update before Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतीच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. तिसरा सामना गुरुवारी होणार आहे आणि त्यानंतर हाच संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. सुवर्णपदक राखण्यासाठी भारतीय संघाने तगड्या खेळाडूंची फौज मैदानावर उतरवली आहे. भारताला थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळायचे आहे, परंतु स्पर्धेपूर्वीच भारताला धक्का बसला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा BCCI च्या सेंटर ऑफ एक्सिलेन्सवर ( CoE) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com