

Asian Games 2026
esakal
Asian Games 2026 Cricket Schedule: आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा जपानमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. भारताकडून पुरुष आणि महिला क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याने चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे. आता क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
भारतीय महिला संघ आधी मैदानात उतरणार असून, पुरुष संघाला मात्र थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.