Viral Video : रजत दलाल-असिम रियाझची हाणामारी अन् शिखर धवनला करावी लागली मध्यस्थी, नेमकं काय घडलं?
Asim Riaz - Rajat Dalal fight: एका इव्हेंटमध्ये रजत दलाल आणि असिम रियाझ यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्याचे दिसले, त्यावेळी त्यांच्यात शिखर धवनला मध्यस्थी करावी लागल्याचे दिसले.
भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनने आत्तापर्यंत अनेकदा क्रिकेट मैदानात त्याच्या बॅटने आक्रमकता दाखवली आहे. पण निवृत्तीनंतर शिखर अभिनय क्षेत्रात उतरल्याचे दिसत आहेत. अशातच आता त्याला रजत दलाल आणि असिम रियाझ यांच्यातील भांडण सोडवावं लागलं आहे.