Mitchell Starc takes five wickets in 22 balls against Bangladesh
esakal
Mitchell Starc takes five wickets in 22 balls against Bangladesh: पहिल्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेल्या बांगलादेशला दुसऱ्या कसोटीत शरणागती पत्करावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याने बांगालदेशची पळता भुई थोडी केली आहे. स्टार्कने पहिल्या चेंडूपासून विकेट घेण्याचे सत्र सुरू केले, ते २२ चेंडूंत त्याने निम्मा संघ तंबूत पाठवला. बांगलादेशने लंच ब्रेकपर्यंत अवघ्या ३६ धावांत ६ फलंदाज गमावले. त्यात स्टार्कने पहिल्या स्पेलमध्ये ९-६-११-५ असा भन्नाट मारा केला.