Josh Hazlewood Taskin Ahmed catch controversy Australia Bangladesh second Test
esakal
Josh Hazlewood frustrated after Taskin gets in the way of catch : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला चांगलाच इंगा दाखवला.. पहिल्या कसोटीतील पराभवाचा राग काढताना बांगलादेशला ६४ धावांवर ऑसींनी गुंडाळले. मिचेल स्टार्कने सहा विकेट्स घेतल्या आणि त्याच्या या स्पेलसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. स्टार्कने १२ धावांत ६ विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने तीन बळी टिपले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ धावांवर तीन विकेट्स गमावल्या. शोरिफूल इस्लामने बांगलादेशला हे यश मिळवून दिले. पण, या सामन्यात एक वादग्रस्त प्रसंग घडला आणि त्याचा Video Viral झाला आहे.