Travis Head Joins Elite List
esakal
AUS vs ENG 5th Test Travis Head century analysis: इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३८४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने खणखणीत शतक झळकावले. अॅशेस मालिकेतील पाचव्या व शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी आघाडीच्या दिशेने कूच केली आहे. हेडने शतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. सिडनीवर शतक झळकावून त्याने एक असा विक्रम नोंदवला, जो यापूर्वी फक्त चार फलंदाजांना झळकावता आला आहे. शिवाय हे त्याचे या अॅशेस मालिकेतील तिसरे शतक ठरले. हेडने वादळी फटकेबाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले. ऑस्ट्रेलियासाठी हे त्याचे १२ वे कसोटी शतक ठरले.