
AUS vs ENG Alex Carey Amazing Catch Alex Carey : आज चॅम्पियन्स ट्रॉफीतील चौथा सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दरम्यान पाकिस्तानमधील लाहोर मैदानावर रंगला आहे. दोन्ही संघ स्पर्धेआधीच्या वन-डे मालिकेत पराभूत पत्कारून आले आहेत. इग्लंड भारताकडून व्हाईट वॉश झाला, तर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेने २-० ने पराभूत केले. अशात ऑस्ट्रेलिया संघ युवा खेळाडूंसह मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि अॅलेक्स केरीने दुसऱ्याच षटकात अप्रतिम झेल करत इंग्लंडला पहिला धक्का दिला.