AUS vs IND Test Series
AUS vs IND Test Seriesesakal

IND vs AUS : आपला Rohit Sharma नाही, तर त्यांचा...! ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू Border-Gavaskar Trophy ला मुकणार

India Tour of Australia Rohit Sharma : भारतीय संघ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पण, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत कर्णधार रोहित शर्मा खेळण्याची शक्यता कमी असल्याचे, वृत्त समोर आले आहे. त्यात आता ऑस्ट्रेलियालाही मोठा धक्का देणारी बातमी मिळाली आहे.
Published on

Border-Gavaskar Trophy 2024-25 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी चुरस नाट्यमय वळणावर आली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हे दोन संघ गुणतालिकेत अव्वल स्थानवर असले तरी त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के नाही. त्यासाठीच आता उर्वरित कसोटी मालिकेचे निकाल अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने भारत वि. ऑस्ट्रेलिया ही मालिका महत्त्वाची आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव खेळणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेंशन वाढलेलं आहे. त्यातच आता ऑस्ट्रेलियालाही मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकण्याची शक्यता बळावली आहे. पाठीच्या दुखापतीसाठी ग्रीनला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे तो ही संपूर्ण मालिका मुकणार आहे. पाठीच्या खालच्या बाजूला फ्रॅक्चर झाल्याने त्याने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकिय टीमशी चर्चा केली आणि अनेकांचा सल्ला घेतल्यानंतर शस्त्रक्रिया करून घेण्याचे त्याने ठरवले.

AUS vs IND Test Series
IND vs AUS : Rohit Sharma ची माघार, मग कोण असेल टीम इंडियाचा कर्णधार? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठा पेच

'जेम्स पॅटिन्सन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन डॉरशुइस या सर्वांनी यापूर्वी मणक्याच्या दुखापतीवर ज्याप्रकारे उपचार घेतले, त्याप्रमाणेच जायचे की नाही, हे येत्या काही दिवसांत ग्रीनने ठरवावे अशी अपेक्षा आहे.क्रिस्टचर्चचे अग्रगण्य सर्जन ग्रॅहम इंग्लिस आणि रोवन शाउटेन यांच्याकडून शस्त्रक्रीया करून घेतल्यास ग्रीनला जवळपास महिनाभर क्रिकेटपासून दूर रहावे लागले,'असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

ग्रीनने २०२० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पम केल आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो मॅन ऑफ दी मॅच होता. त्याने त्या सामन्यात नाबाद १७४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २८ सामन्यांत त्याने ४८.५७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि ३५ विकेट्स घेतल्या आहेत. ग्रीनने शस्त्रक्रीया करून घेण्याचे ठरवल्यास त्याला भारताविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी सहाव्या क्रमांकासाठी तगडा पर्याय शोधावा लागेल. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यातही कॅमेरून ग्रीन खेळणार नाही.

ग्रीनच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श याच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल, तर स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर खेळू शकेल. मार्कस हॅरीस, कॅमेरून बँक्रॉफ्ट, मॅथ्यू रेनशॉ, निक मॅडीन्सन किंवा युवा फलंदाज सॅम कोन्स्तास यांच्यासह उस्मान ख्वाजा यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल.

AUS vs IND Test Series
PAK vs ENG : इंग्लंडने इतिहास रचला, पाकिस्तानचा पार कचरा केला! Multan Test मध्ये विक्रमांचा पाऊस पडला

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी: ६ ते १० डिसेंबर, एडिलेड

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बेन

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी: २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया, पाचवी कसोटी: ३ ते ७ जानेवारी, २०२५, सिडनी

१९९१-९२ नंतर प्रथमच दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com