IPL रंगात आली असतानाच 'या' खेळाडूंना मोठा धक्का! बोर्डाने सेंट्रल काँट्रॅक्टमधून केली हकालपट्टी

Cricket Australia central contracts list : अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या भारतात होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये आपापल्या फ्रँचायझींसाठी खेळत आहेत.
Cricket Australia Central Contracts Marathi News
Cricket Australia Central Contracts Marathi Newssakal

Cricket Australia central contracts list : अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या भारतात होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये आपापल्या फ्रँचायझींसाठी खेळत आहेत. या स्पर्धेनंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

त्याआधीही ऑस्ट्रेलियाने 2024-25 साठी केंद्रीय करारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीत अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, अष्टपैलू ॲश्टन अगर आणि मार्कस स्टॉइनिस या खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. यासोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 28 मार्च रोजी जाहीर केलेल्या नवीन वार्षिक केंद्रीय करार 4 नवीन खेळाडूंचाही समावेश केला आहे.

Cricket Australia Central Contracts Marathi News
IPL 2024 : 'चप्पल तुझी वाट बघतीये...' तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतरही अभिषेकवर भडकला युवराज सिंग, ट्विट व्हायरल

ऑस्ट्रेलियन फलंदाज वॉर्नरने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्नरला करारातून बाहेर काढणे अपेक्षेप्रमाणे होते.

मात्र, स्टॉइनिसला वगळणे हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आश्चर्यकारक निर्णय आहे. स्टॉइनिस आयपीएलमध्येही भाग घेत आहे आणि लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळतो. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौऱ्याला मुकला असला तरी तो टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

Cricket Australia Central Contracts Marathi News
RR vs DC IPL 2024 : दिल्ली राजस्थानला रोखणार? पंतची सेना पहिल्या विजयासाठी सज्ज; किती वाजता रंगणार थरार?

वेगवान गोलंदाज जेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस या खेळाडूंचा प्रथमच करारात समावेश करण्यात आला आहे. बार्टलेट आणि एलिस व्यतिरिक्त, बॅट्समन मॅट शॉर्ट आणि अष्टपैलू ॲरॉन हार्डी यांचाही या वर्षी केंद्रीय करारामध्ये समावेश करण्यात आला आहे. या चार खेळाडूंनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

शॉर्ट आणि हार्डीने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पण केले होते, तर एलिस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता.

Cricket Australia Central Contracts Marathi News
SRH Vs MI : मुंबईच्या पराभवानंतर रोहित शर्माने सर्वांसमोर घेतली कर्णधार हार्दिक पांड्याची शाळा...

ऑस्ट्रेलिया 2024-25 साठी करारबद्ध खेळाडूंची यादी -

शॉन ॲबॉट, जेवियर बार्टलेट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टॉड मर्फी, झाय रिचर्डसन, मॅट स्कॉट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ॲडम झाम्पा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com