IPL 2024 : 'चप्पल तुझी वाट बघतीये...' तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतरही अभिषेकवर भडकला युवराज सिंग, ट्विट व्हायरल

Yuvraj Singh on Abhishek Sharma : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 हंगामात पहिला विजय नोंदवला आहे.
Yuvraj Singh on Abhishek Sharma Marathi news
Yuvraj Singh on Abhishek Sharma Marathi newssakal

Yuvraj Singh on Abhishek Sharma : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 हंगामात पहिला विजय नोंदवला आहे. हैदराबाद येथील त्यांच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या विक्रमी सामन्यात एसआरएचने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला.

हैदराबादच्या या विजयात अनेक हिरो होते, ज्यामध्ये संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. असे असतानाही माजी अष्टपैलू युवराज सिंग त्याच्यावर रागावला.

Yuvraj Singh on Abhishek Sharma Marathi news
SRH Vs MI : मुंबईच्या पराभवानंतर रोहित शर्माने सर्वांसमोर घेतली कर्णधार हार्दिक पांड्याची शाळा...

अभिषेक शर्माने 23 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या खेळीत त्याच्या बॅटमधून सात षटकार आणि तीन चौकार आले. आणि त्याने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने प्रथम ट्रॅव्हिस हेडसोबत महत्त्वाची भागीदारी रचली. या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार हल्ला चढवला.

मात्र या सगळ्यानंतर अभिषेकच्या खेळीवर युवराज सिंग नाराज दिसला. पण खरं तर, अभिषेक ज्या शॉटवर आऊट झाला, त्यामुळे युवराज चिडला होता. युवराज सिंगने त्याच्या एक्स-हँडलवर लिहिले की, “वाह सर अभिषेक वाह… अप्रतिम खेळी खेळली पण आऊट झालेल्या शॉट काय मारलास. लोकांना मऊ भाषा समजत नाही. आता एक खास चप्पल तुमची वाट पाहत आहे.

Yuvraj Singh on Abhishek Sharma Marathi news
SRH vs MI IPL 2024 : असा रेकॉर्ड ब्रेक सामना होणे नाही! षटकार-चौकारचा पाऊस... जाणून घ्या कोणते विक्रम मोडले?

युवराज सिंग हा अभिषेक शर्माचा मेंटर आहे. अंडर-19 पासून अभिषेक युवराज सिंगसोबत प्रशिक्षण घेत आहे. त्याच्यासोबत शुभमन गिल हा देखील युवराजचा विद्यार्थी राहिला आहे. यामुळेच युवराज सिंग अभिषेकच्या फलंदाजीवर बारीक नजर ठेवतो. शुभमन गिल आऊट झाल्यानंतरही युवराजने असे ट्विट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com