ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

ICC Annual Ranking: आयसीसीने नव्याने वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कसोटी, वनडे आणि टी20मधील क्रमवारीत काही बदल झाले आहेत.
Australia | Team India | ICC Ranking
Australia | Team India | ICC RankingSakal

ICC Annual Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी वार्षिक सांघिक क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीनुसार आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने कसोटीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांनी भारताला मागे टाकत अव्वल क्रमांकावर हक्क सांगितले आहे. मात्र, मर्यादीत षटकातील क्रिकेटमध्ये भारताचेच वर्चस्व राहिले आहे.

या वार्षिक क्रमवारीत मे 2021 नंतरच्या सामन्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे डिसेंबर 2020-जानेवारी 2021 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला कसोटी विजय या क्रमवारीतून बाहेर झाला आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार ताज्या क्रमवारीत मे 2021 ते मे 2023 दरम्यान झालेल्या सामन्यांच्या निकालाचा 50 टक्के विचार झाला आहे, तर गेल्या 12 महिन्यातील सामन्यांचा 100 टक्के विचार केला आहे.

Australia | Team India | ICC Ranking
Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

कसोटी क्रमवारी

ऑस्ट्रेलियाने गेल्यावर्षी जिंकलेली कसोटी चॅम्पियनयशीपचा अंतिम सामन्याने त्यांना हा अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी मोठी मदत केली आहे. गेल्यावर्षी जून २०२३ मध्ये द ओव्हलवर झालेल्या या अंतिंम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला २०९ धावांनी पराभूत करत चॅम्पियनशीप जिंकली होती.

दरम्यान, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचे आता १२४ पाँइंट्स झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचे १२० पाँइंट्स आहेत. त्यामुळे या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचे १०५ पॉइंट्स आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका (103), न्यूझीलंड (96), पाकिस्तान (89), श्रीलंका (83), वेस्ट इंडिज (82) आणि बांग्लादेश (53) संघ आहेत.

Australia | Team India | ICC Ranking
IPL 2024: माहीला पाहून खुश झाला 103 वर्षांचा सुपरफॅन! धोनी अन् CSK कडून मिळालं स्पेशल गिफ्ट...पाहा Video

वनडे आणि टी20 क्रमवारी

त्याचबरोबर या वार्षिक क्रमवारी अपडेटनुसार वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये मात्र भारतीय संघ अव्वल क्रमांकावर कायम राहिला आहे. वनडे क्रमवारीत भारतीय संघ 122 पाँइंट्सनुसार अव्वल क्रमांकावर आहे, तर 116 पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे.

दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 112 पाँइंट्स आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तान (106), न्यूझीलंड (101) , इंग्लंड (95), श्रीलंका (93), बांग्लादेश (86), अफगाणिस्तान (80) आणि वेस्ट इंडिज (69) आहेत.

टी२० क्रमवारीत भारतीय संघ 264 पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. या क्रमवारीतही दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच आहे. त्यांनी इंग्लंडला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाचे 257 पाँइंट्स आहेत, तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 252 पाँइंट्स आहेत. चौथा क्रमांक 250 पाँइंट्ससह दक्षिण आफ्रिकेने मिळवला असून पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंड असू त्यांचेही 250 पाँइंट्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com