Jasprit Bumrah - Mohammed Siraj | Australia vs India 4th TestSakal
Cricket
IND vs AUS 4th Test: बुमराह-सिराजचा भेदक मारा, पण लॅबुशेन-कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचं शेपूट वळवळलं; भारताचं टेन्शन वाढलं
Australia vs India Boxing Day Test: बॉक्सिंग डे कसोटीत सिराज आणि बुमराह यांनी भेदक मारा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव चौथ्या दिवशी संपुष्टात येईल असे चित्र होते. परंतु, त्यांच्या शेवटच्या जोडीने चिवट झुंज दिली.
Australia vs India 4th Test: बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताकडून वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भेदक मारा केला. त्यांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्यामुळे चौथ्या दिवशी संपुष्टात येईल असे चित्र होते. परंतु, त्यांच्या शेवटच्या जोडीने चिवट झुंज दिली.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८२ षटकात ९ बाद २२८ धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०५ धावांची आघाडी घेतलेली असल्याने आता ते चौथ्या दिवस अखेर ३३३ धावांनी पुढे आहेत.
शेवटच्या दिवशी आता ९८ षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसमोर या ९८ षटकात निकाल लावण्याचे आव्हान असणार आहे.

