T20 World Cupपूर्वी संघात फेरबदल! दोन खेळाडूची टीममध्ये अचानक एंट्री

वेस्ट इंडीज व अमेरिका येथे एक जूनपासून टी-२० विश्‍वकरंडकाला सुरुवात होणार आहे.
Australia’s T20 World Cup squad Jake Fraser-McGurk added as a reserve
Australia’s T20 World Cup squad Jake Fraser-McGurk added as a reservesakal

Australia T20 World Cup squad : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मोलाची कामगिरी करणारा युवा फलंदाज जेक फ्रेसर मॅकगर्क याला ऑस्ट्रेलियाच्या टी-२० विश्‍वकरंडकासाठीच्या संघात स्थान मिळले आहे. मॅकगर्क याला पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

वेस्ट इंडीज व अमेरिका येथे एक जूनपासून टी-२० विश्‍वकरंडकाला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी टी-२० संघाची निवड केली तेव्हा पर्यायी खेळाडू म्हणून एकालाच विश्‍वकरंडकाला पाठवण्यात यावे असे सुचवले होते, पण मॅकगर्क याची आयपीएलमधील फलंदाजी बघितल्यानंतर मॅथ्यू शॉर्ट याच्यासह मॅकगर्क याचीही निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयपीएलमधील प्ले-ऑफचा थरार मंगळवारपासून रंगणार आहे. यादरम्यान ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल व कॅमेरुन ग्रीन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमधील विविध संघांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे या आठवड्यात हे खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाशी जोडले जाणार नाहीत.

या खेळाडूंचा सराव

ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी टी-२० विश्‍वकरंडकाच्या सरावाला सुरुवात केली आहे. मिचेल मार्श, जॉश हॅझलवूड, जॉश इंग्लिस, ॲडम झॅम्पा व ॲश्‍टन ॲगर या खेळाडूंनी सराव केला आहे. मिचेल मार्श दुखापतीमधून सावरत आहे. त्यामुळे त्याने सध्या तरी गोलंदाजी केलेली नाही.

नामिबिया, विंडीजविरुद्ध सराव सामने

ऑस्ट्रेलियन संघ गुरुवारी टी-२० विश्‍वकरंडकासाठी वेस्ट इंडीजला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाला नामिबिया व यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध सराव सामना खेळावयाचा आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्‍वकरंडकातील सलामीचा सामना पाच जूनला ओमानविरुद्ध असणार आहे.

टी-२० विश्‍वकरंडकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ ः टीम डेव्हिड, ट्रॅव्हिस हेड, जॉश इंग्लिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, कॅमेरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, ॲश्‍टन ॲगर, पॅट कमिन्स, नॅथन इलिस, जॉश हॅझलवूड, मिचेल स्टार्क, ॲडम झॅम्पा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com