

Cricket Australia
esakal
Ashes Test in India: भविष्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना भारतात खेळवला जाऊ शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी याबाबत मोठे संकेत दिले आहेत.
सध्या टी-२० क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट पुन्हा चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर विचार सुरू आहे. त्यामध्ये भारतात ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटी खेळवण्याचाही पर्याय असल्याचं ग्रीनबर्ग यांनी म्हटलं आहे.