
Australia vs India Pink Ball Test Time : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यात बऱ्याच वर्षांनी दोन संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेट चाहते सकाळी ७.५० वाजल्यापासून टिव्हीसमोर बसले होते, परंतु आता दुसऱ्या कसोटीसाठी एवढ्या सकाळी उठण्याची आवश्यकता नाही. पण, या कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्मा कोणता गेम प्लान आखतो याची उत्सुकता आहे.