
Australia vs India 4th Test: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात १८४ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेतील पराभवही टाळला आहे. आता सिडनीमध्ये होणाऱ्या अखेरच्या कसोटीत त्यांना मालिका विजयाची, तर भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी असणार आहे.