ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत इंग्लंडवर ३-० अशी आघाडी घेतली आहे. ऍडलेडच्या तिसऱ्या कसोटीत त्यांनी ८२ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलियाचे स्थान भक्कम झाले आहे. .ऍशेस २०२५-२६ या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे मायदेशात इंग्लंडवर वर्चस्व दिसून येत आहे. ऍडलेडला झालेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी (रविवारी, २१ डिसेंबर) इंग्लंडला ८२ धावांची पराभूत केले आहे. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता यापुढच्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया निर्विवाद वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्नात असेल, तर इंग्लंडला प्रतिष्ठा राखण्यासाठी पुढील दोन्ही सामने खेळावे लागणार आहेत..Ashes Test: ॲशेस कसोटीत ‘डीआरएस’वर शंका; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, कॅरीनंतर स्मिथच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह.ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२६ स्पर्धेचाही भाग असल्याने या सामन्याचा परिणाम गुणतालिकेवरही झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या गुणतालिकेतही वर्चस्व ठेवल्याचे दिसत आहे. त्यांची या स्पर्धेतील ही दुसरीच मालिका आहे, तसेच त्यांनी आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत. ऍडलेडचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील सगल सहावा विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १०० विजयी टक्केवारीसह अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे. ऑस्ट्रेलियाची ही कामगिरीपासून बाकी संघांवरील दबाव मात्र वाढणार आहे, कारण ऑस्ट्रेलियाने पहिले सहाही सामने जिंकून या गुणतालिकेत मोठी आघाडी मिळवली असून यामुळे त्यांच्यासाठी पहिल्या दोन क्रमांकावर राहण्यासाठी पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. मात्र असे असताना दुसऱ्या संघांना त्यांना मागे टाकण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे..या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका ७५ टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर, तर ६६.६७ टक्केवारीसह न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड पाठोपाठ असलेल्या श्रीलंकेचेही ६६.६७ टक्केवारी आहे. पाचव्या क्रमांकावर ५० टक्केवारीसह पाकिस्तान आहे. भारतीय संघ सहाव्या क्रमांकावर आहे. भारताचे ४८.१५ टक्केवारी आहे. भारताने ९ सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहे, तर ४ सामने पराभूत झाले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.इंग्लंड या पराभवानंतर सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे २७.०८ टक्केवारी आहे. बांग्लादेश १६.६७ टक्केवारीसह आठव्या आणि वेस्ट इंडिज ४.७६ टक्केवारीसह नवव्या क्रमांकावर आहे..ऑस्ट्रेलियाचा विजयतिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९१.२ षटकात सर्वबाद ३७१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने ८२ आणि ऍलेक्स कॅरेने १०६ धावांची खेळी केली. तसेच मिचेल स्टार्कने ५४ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात २८६ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ८३ धावांची खेळी केली, तर जोफ्रा आर्चरने ५१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने या डावात ८५ धावांची आघाडी घेतली..Ashes Series: ॲशेस मालिका विजय ऑस्ट्रेलियाच्या समीप; ३४९ धावांच्या आव्हानासमोर इंग्लंडची ६ बाद २०७ अवस्था.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ८४.४ षटकात सर्वबाद ३४९ धावा केल्या. या डावात ट्रेव्हिस हेडने १७० धावांची खेळी केली. ऍलेक्स कॅरेने ७२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जोश टंगने ४ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाने ४३५ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला १०२.५ षटकात ३५२ धावा करता आल्या. इंग्लंडकडून झॅक क्रावलीने ८५ धावांची खेळी केली, तर जॅमी स्मिथने ६० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.