T20 world Cup : ऑस्ट्रेलियाचा ओमानवर विजय

सहा महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपली मोहीम अपेक्षित विजयाने सुरू केली. त्यांच्या तुलनेत कमकुवत असलेल्या ओमानचा ३९ धावांनी पराभव केला.
T20 world Cup
T20 world Cup sakal

ब्रिजटाऊन: सहा महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपली मोहीम अपेक्षित विजयाने सुरू केली. त्यांच्या तुलनेत कमकुवत असलेल्या ओमानचा ३९ धावांनी पराभव केला.

अनुभवात किती तरी पटीने सरस असलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ सलामीच्या या सामन्यात किती मोठा विजय मिळवतो, याची उत्सुकता होती; परंतु प्रथम फलंदाजीत १६४ धावा केल्यावर त्यांना केवळ ३९ धावांच्या फरकानेच विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिस यांनी आक्रमक अर्धशतके केली. ट्रॅव्हिड हेड, कर्णधार मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मात्र संधीचा फायदा घेता आला नाही.

विश्वविजेता कर्णधार पॅट कमिंसला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली तरी गोलंदाजीतील त्यांची ताकद कमी झाली नव्हती. सहा बाद ५७ अशी अवस्था झाल्यानंतरही ओमानने २०व्या षटकापर्यंत फलंदाजी केली.आयपीएल अंतिम सामना आपल्या तुफानी गोलंदाजीने गाजवणाऱ्या मिचेल स्टार्कने या सामन्यातही तेवढाच भेदक मारा केला.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ५ बाद १६४ (डेव्हिड वॉर्नर ५६ - ५१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, ट्रॅव्हिस हेड १२, मिचेल मार्श १४, ग्लेन मॅक्सवेल ०, मार्कस स्टॉयनिस ६७ - ३६ चेंडू, २ चौकार, ६ षटकार, बिलाल खान ४-०-३६-१, कलीमउल्ला ३-०-३०-१, मेहरान खान ४-०-३८-२). वि. वि. ओमान ः २० षटकांत ९ बाद १२५ (अकिब इलियास १८, आयन खान ३६, मेहरन खान २७, मिचेल स्टार्क ३-०-२०-२, नॅथन इलिस ४-०-२८-२, ॲडम झॅम्पा ४-०-२४-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com