International Masters League 2025 season AUS vs WI T20: ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने ( Shane Watson ) इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ हंगामातील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सविरुद्ध ४८ चेंडूत शतक झळकावले. यष्टिरक्षक-फलंदाज बेन डंकसह डावाची सुरुवात करताना, वॉटसनने डावाच्या पहिल्या १५ षटकांत शतक पूर्ण केले. त्यात ९ चौकार व ९ षटकारांसह १८ चेंडूंत ९० धावांची आतषबाजी केली होती. आयएमएल ट्वेंटी-२० मधील हे कोणत्याही फलंदाजाने नोंदवलेले पहिले शतक ठरले आहे.