
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेड ( Travis Head) याला २०२५ च्या अॅलन बॉर्डर मेडल दिले गेले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्कारांचे काल वितरण झाले आणि त्यात हेडने सर्वाधिक २०८ मत घेत, मेडल जिंकले. त्याने जोश हेझलवूडपेक्षा ५० आणि पॅट कमिन्सपेक्षा ६१ मतं जास्त जिंकली. हेडने मागील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये अविस्मरणीय खेळी करून भारताकडून जेतेपद हिसकावले होते. २०२३ मध्ये त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्येही दमदार खेळी करून भारताच्या जेतेपदाच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. मागील महिन्यात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतही तो चांगला खेळला होता.