
Australia’s 2025-26 Central Contract : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) वार्षिक कराराची घोषणा करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. श्रेयस अय्यर याला पुन्हा वार्षिक करार मिळणार असल्याचे पक्के वृत्त आहे. अशात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या २०२५-२६ या वर्षाच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे आणि त्यांनी २३ खेळाडूंना करार दिला आहे. त्यामध्ये तीन जुन्या चेहऱ्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे.