Australian all-rounder Glenn Maxwell announces sudden ODI retirement : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि ३ जूनला त्यांचा सामना रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. या लढतीपूर्वी पंजाब किंग्स आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने वन डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. मॅक्सवेलने १३ वर्षांच्या वन डे कारकीर्दिला पूर्णविराम लावण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. मॅक्सवेलला आयपीएल २०२५ मध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. ७ सामन्यांत त्याने फक्त ४८ धावा केल्या आहेत आणि दुखापतीमुळे त्याने माघार घेतली होती.