इंग्लंड दौऱ्यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
जसप्रीत बुमराह आशिया चषकात व्यस्त असल्यामुळे कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.
मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा हे प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून कामगिरी करणार आहेत.
India Revamps Test Squad for West Indies Series : भारतीय संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौरा गाजवला आणि पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. पाचव्या कसोटीत मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांनी गोलंदाजीत कमाल दाखवताना इंग्लंडला अवघ्या ६ धावांनी हार मानण्यास भाग पाडले. रोहित शर्मा, विराट कोहली व आर अश्विन या तीन दिग्गजांच्या निवृत्तीनंतर ही टीम इंडियाची पहिलीच कसोटी मालिका होती. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या आणि सारेजण खेळ पाहून तृ्प्त झाले. आता भारताची पुढील कसोटी मालिका घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध आहे आणि त्यासाठीच्या संघात काही बदल पाहायला मिळणार आहेत.