वर्ल्ड कप विजयाचा नायक, देशांतर्गत स्पर्धांचा स्टार... भारताच्या जबरदस्त खेळाडूची ३२ व्या वर्षी निवृत्ती; क्रिकेटवर्तुळात मोठा धक्का

Baba Aparajith announces retirement from professional cricket: भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवणारा बाबा अपराजित याने वयाच्या ३२ व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Baba Aparajith announces retirement from professional cricket

Baba Aparajith announces retirement from professional cricket

esakal

Updated on: 

Former Tamil Nadu batter Baba Aparajith retirement news: तामिळनाडूचा माजी फलंदाज बाबा अपराजित याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या २०२६-२७ हंगामाच्या मध्यांतरातच ३२ वर्षीय क्रिकेटपटूने थांबण्याचा निर्णय घेतला. त्याने १०२ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने गाजवले आणि तो बहुतांश सामने तामिळनाडू संघाकडून खेळला. २०२४-२५ च्या हंगामात तो केरळ संघाकडून खेळला होता. त्याच्या नावावर सर्व फॉरमॅटमध्ये मिळून २० शतकं आहेत. त्याने तामिळनाडूकडून ( विजय हजारे २०१७-१८ आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२०-२१ व २०२१-२२) तीन स्पर्धांचे जेतेपद जिंकले आहे.

Loading content, please wait...