

BABAR AZAM
esakal
BABAR AZAM 7000 RUNS AS CAPTAIN: पाकिस्तानचा संघ अडचणीत असताना पुन्हा एकदा बाबर आझम त्याच्या मदतीला धावून आला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने पहिले दोन सामने गमावून मालिका आधीच हातातून घालवली होती.
तिसऱ्या सामन्यातही संघाची अवस्था अशी झाली होती की, हा सामना लवकरच संपेल असं वाटत होतं. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजांनी झुंज दिली आणि त्यात बाबर आझमनेही महत्त्वाची भूमिका बजावली.