

Babar Azam returns to domestic first-class cricket after seven years
esakal
BABAR AZAM TO PLAY DOMESTIC CRICKET AFTER 7 YEARS: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम तब्बल ७ वर्षांनंतर पुन्हा देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना आपल्याला दिसणार आहे. खराब फॉर्म आणि पाकिस्तानच्या संघाची सध्याची कामगिरी पाहता बाबरला आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे लागणार आहे.
त्याने जवळपास ४० डावांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतकही केलेले नाही. त्यामुळे फॉर्ममध्ये परतण्यासाठी तो आता लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळणार आहे. बाबरने २०१९ नंतर पाकिस्तानमध्ये एकही देशांतर्गत प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. अशातच आता तो देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळनार असल्याच सांगितल जात आहे.