Babar Azam: बाबर आझमने मैदान सोडले! इंग्लंडचा सामना करण्यापूर्वीच माघार घेतली, आयत्यावेळी पाकिस्तान कर्णधाराच्या शोधात

Babar Azam Injury Before England Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! बाबर आझमच्या हाताला दुखापत झाल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; कर्णधारपदासाठी शान मसूद की सलमान आगा?
Babar Azam

Babar Azam

esakal

Updated on

Babar Azam Injury Before England Test: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १९ ऑगस्टपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम हाताच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बाबर खेळला नाही, तर पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एका प्रोफेशनल काऊंटी क्लबच्या सिलेक्ट-११ विरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाजी करताना वेगवान चेंडू बाबरच्या उजव्या हातावर आदळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com