Babar Azam completes 2,000 ODI runs in Pakistan
Babar Azam latest ODI milestone against England: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याला सूर गवसला असे वाटत असताना विल जॅक्सच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. जॅक्सला हलक्यात घेण्याची चूक बाबरला महागात पडली आणि चेंडू आत वळून यष्टींवर आदळला. बाबर असहाय्य होऊन गोलंदाजाकडे पाहत उभा राहिला. ३४ धावांचे योगदान देऊनही बाबरच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला अन् तो भारताचा वन डे संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला.