Babar Azam leaves the Big Bash League midway after Mark Waugh publicly urged Sydney Sixers
esakal
Mark Waugh urges Sydney Sixers to drop Babar Azam: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याने बिग बॅश लीग मध्यावरच सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनी सिक्सर्सची प्ले ऑफसाठी हॉबर्ट हरिकेन्सविरुद्धचा सामना होणार आहे आणि त्यापूर्वी बाबरच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. बाबरला बिग बॅश लीगमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानी फलंदाज BBL मध्ये संघर्ष करताना दिसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मार्क वॉ याने त्याला संघातून वगळा अशी विनंती सिडनी सिक्सर्सकडे केली होती. त्यातच बाबरचा हा निर्णय आल्याने पाकिस्तानी चाहत्यांना धक्का बसला. पण, त्याने हा निर्णय पाकिस्तान क्रिकेट संघासाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे.