Babar Azam's disappointing domestic cricket performances have sparked debate among fans
esakal
Babar Azam poor form continues in Pakistan domestic cricket: पाकिस्तानचा स्वयंघोषित स्टार बाबर आझम हा देशांतर्गत क्रिकेटमध्येही नव्या पोरांसमोर अडखळताना दिसतोय. राष्ट्रीय संघाकडून सातत्याने अपयशी ठरलेला बाबर सूर मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळायला उतरला, परंतु इथेही तोच कित्ता कायम राहिला. क्वुएद ए आझम ट्रॉफीत लाहोर व्हाईट्स संघाकडून खेळणाऱ्या बाबरला अजून प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याने एफएटीए संघाविरुद्धच्या सामन्यात २८ व ४२ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेलबाद झाल्यानंतर त्याने राग व्यक्त केला.