बाबर आझमचा खराब फॉर्म अद्यापही कायम आहे.बाबर आझम वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत शून्यावर बाद झाला.जेडन सील्सने त्याला तिसऱ्याच चेंडूवर बोल्ड केले..पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचा खराब फॉर्म कायम राहिला आहे. गेले अनेक महिने तो मोठ्या खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतही तो फारसा कमाल करू शकलेला नाही. त्यामुळे आता त्याच्या संघातील भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहेत. नुकताच रविवारी (१० ऑगस्ट) ब्रायन लारा स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघात दुसरा वनडे सामना पार पडला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने ५ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, बाबर आझम या सामन्यात शून्यावर बाद झाला..झाले असे की पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. त्यांच्याकडून सईम आयुब २३ झावा करून ९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. जेडन सील्सच्या गोलंदाजीवर त्याचा झेल जस्टीन ग्रीव्ह्जने घेतला. त्यामुळे बाबर आझम फलंदाजीला आला. त्याला पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर त्याचा तिसरा आणि ९ व्या षटकातील शेवटचा चेंडू सील्सने फुल लेंथचा टाकला. ज्यावर बाबरने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे बाबर आझमला एकही धाव न करता माघारी परतावे लागले. त्याच्या विकेटचा व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय..बाबर आझम वनडेत शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ होती. तो यापूर्वी शेवटचा ऑगस्ट २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शून्यावर वनडेमध्ये बाद झाला होता. पण त्यानंतर त्याने २०२३ आशिया कपमध्ये सलग दोन अर्धशतके आणि मग नेपाळविरुद्ध शतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्याला अद्याप एकही शतक करता आलेलं नाही. त्यानंतर तो २८ वनडे खेळला. मात्र तो ९२९ धावाच करू शकला आहे. इतकेच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारात मिळून गेल्या ७१ डावात त्याला एकदाही शतक करता आलेलं नाही. त्यामुळे सध्या त्याच्यावर टीकाही होत आहे. त्याने आशिया कप २०२३ नंतर १० कसोटीत केवळ २३.१५ च्या सरासरीने धावा केल्यात, तर टी२० मध्ये २४ सामन्यांत ३३.५४ च्या सरासरीने ७३८ धावा केल्यात..पाकिस्तानचा पराभवदरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला ३७ षटकात ७ बाद १७१ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून हसन नवाझने सर्वाधिक ३६ धावांची नाबाद खेळी केली. तसेच हुसैन तलतने ३१ धावांची खेळी केली. शफीकने २६ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना जेडन सील्सने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जेदी ब्लेड्स, शामर जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली..त्यानंतर वेस्ट इंडिजसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार ३५ षटकात १८१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे लक्ष्य वेस्ट इंडिजने ३३.२ षटकात ५ बाद १८४ धावा करत पूर्ण केले. यासोबतच मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. वेस्ट इंडिजकडून शेरफेन रुदरफोर्डने ४५ धावांची खेळी केली, तर रोस्टन चेसने नाबाद ४९ धावा केल्या. कर्णधार शाय होपने ३२ धावा केल्या, तर जस्टिन ग्रिव्हजने नाबाद २६ धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हसन अली आणि मोहम्मद नवाझ प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. अब्रार अहमदने १ विकेट घेतली..FAQs१. बाबर आझम वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात किती धावा करून बाद झाला?(How many runs did Babar Azam score in this match?)→ बाबर आझम वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात शून्यावर बाद झाला.२. बाबर आझमला कोणत्या गोलंदाजाने बाद केले?(Which bowler dismissed him?)→ जेडन सील्सने बाबर आझमला बोल्ड केले.३. पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात किती धावा केल्या?(How many runs did Pakistan score in this match?)→ पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत ३७ षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या.४. वेस्ट इंडिजला पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत किती षटकांत किती धावांचे लक्ष्य मिळाले?(What was West Indies’ target and overs to chase?)→ वेस्ट इंडिजला पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या वनडेत डकवर्थ लुईस नियमानुसार ३५ षटकांत १८१ धावांचे लक्ष्य मिळाले.५. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा कोणी केल्या?(Who scored the most runs for West Indies?)→ रोस्टन चेसने नाबाद ४९ धावा केल्या.६. बाबर आझमचा वनडेत शून्यावर बाद होण्याचा हा कितवा प्रसंग होता?(How many times has Babar Azam been out for zero in ODIs?)→ बाबर आझम वनडेत शून्यावर बाद होण्याची पाचवी वेळ होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.