Babar Azam walks back disappointed after another duck
esakal
Most ducks by a Pakistan batsman in T20 international cricket : पाकिस्तानात सुरू असलेल्या तिरंगी ट्वेंटी-२० मालिकेतील सहाव्या सामन्यात यजमानांना पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम ( Babar Azam Ducks) हा पुन्हा एकदा त्याच्या फॉर्माशी संघर्ष करताना दिसला. सलमान अली आघाच्या नेतृत्वाखाली खेळताना १८५ धावांचा पाठलाग करताना बाबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि दुसऱ्याच चेंडूवर खातं न उघडता माघारी परतला. दुष्मंथा चमिराने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाबरला तंबूची वाट दाखवण्यात आली .