

BABAR AZAM
esakal
Babar Azam says PCB did not consult him before dropping players: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) पोलखोल केली आहे. पाकिस्तानचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पहिल्या दोन सामन्यांत त्यांना सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळेच तिसऱ्या कसोटीपूर्वी PCB ने ७ खेळाडूंना आणि मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद व गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना घरी पाठवले. संघात अचानक इतके बदल केल्याने माजी खेळाडूंनी टीका केली आणि आता कर्णधार बाबरच्या विधानानं नवा वादाला तोंड फुटणार आहे.