Babar Azam: बाबर आझमला सेल्फीचा इतका राग आला की... चाहत्याचा मोबाईल घेतला अन् थेट मैदानाबाहेर भिरकावला! नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

BABAR AZAM VIRAL VIDEO: बाबर आझमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेल्फीसाठी चाहते मैदानात आल्यानंतर बाबरने एका चाहत्याला दूर केलं आणि दुसऱ्या चाहत्याचा मोबाईल घेऊन दूर फेकला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.
BABAR AZAM VIRAL VIDEO

BABAR AZAM VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

BABAR AZAM VIRAL VIDEO: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. बाबरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही चाहते सेल्फी घेण्यासाठी थेट मैदानात आल्याचं दिसत आहे. यावेळी बाबरने एका चाहत्याला दूर केलं, तर दुसऱ्या चाहत्याचा फोन घेऊन तो थेट फेकूनच दिला.

हा प्रकार पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रेसिडेंट्स ट्रॉफी ग्रेड-१ स्पर्धेत घडला. बुधवारी (३० सप्टेंबर) इस्लामाबादमधील डायमंड क्रिकेट ग्राउंडवर OGDCL आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) यांच्यात सामना सुरू होता. बाबर OGDCLकडून या सामन्यात खेळत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com