No Rohit-Virat Showdown! India vs Bangladesh Series Suspended
रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या दोघांनी आंतरराष्ट्रीय कसोटी व ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि त्यामुळे ते टीम इंडियाच्या वन डे संघाचे सदस्य आहेत. ही दोघं ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता होती. पण, आता एक मोठी बातमी हाती आली आहे. भारतीय संघाचा बांगलादेश दौरा प्रभावीपणे रद्द झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पुढील महिन्यात नियोजित असलेल्या मालिकेची तयारी थांबवली आहे. दोन्ही देशांमधील बिघडलेले राजनैतिक संबंध याचा परिणाम असल्याचे समजते.