BAN vs AUS 2nd ODI : बांगलादेशने इतिहास रचला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली वन डे मालिका; वर्ल्ड कप विजेत्यांना अक्षरशः रडवले

Bangladesh first ever ODI series win against Australia: बांगलादेश क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मालिकेतील अखेरचा सामना आता केवळ औपचारिकता ठरला आहे.
Bangladesh first ever ODI series win against Australia

Bangladesh first ever ODI series win against Australia

esakal

Updated on

Australia suffer first ODI series defeat to Bangladesh: बांगलादेश क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. २०२३ च्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला त्यांनी दुसऱ्या वन डे सामन्यातही पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने मिरपूर येथील लढतीत लोटांगण घातले आणि बांगलादेशने क्रिकेट इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या दोन विजयांपूर्वी बांगलादेशने २००५ मध्ये ऑस्ट्रेलियावर वन डे सामन्यात विजय मिळवला होता. पण, मालिकेत बाजी मारण्याची ही त्यांची पहिलीच वेळ ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com