Pakistan Cricket: पाकड्यांनी गुडघे टेकले! बांगलादेशने वन डे सामना १५.१ षटकांत जिंकला

Pakistan all out for 114 vs Bangladesh : पाकिस्तानच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ११४ धावांवर गारद झाले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या फलंदाजीवर वर्चस्व गाजवत त्यांना सावरण्याची संधीच दिली नाही.
Pakistan vs Bangladesh 1st ODI

Pakistan vs Bangladesh 1st ODI

esakal

Updated on

Pakistan vs Banlgadesh 1st ODI : बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला पहिल्याच वन डे सामन्यात गुडघे टेकायला लागले आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानचा संघ नव्या तयारीसाठी मैदानावर उतरला, परंतु त्यांच्या वाट्याला तेच अपयश आलेले दिसले. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानला ११४ धावाच करता आल्या. बांगलादेशने हे लक्ष्य १५.१ षटकांत पार केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com