BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Salman Ali Agha bizarre run out vs Bangladesh video: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एक विचित्र आणि नाट्यमय प्रसंग घडला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा फलंदाज सलमान अली आघा स्वतःच्याच चुकीमुळे रनआउट झाला आणि त्यानंतर मैदानावर चांगलाच वाद रंगला.
Salman Ali Agha was run out in a bizarre manner by Mehidy Hasan Miraz during the BAN vs PAK match

Salman Ali Agha was run out in a bizarre manner by Mehidy Hasan Miraz during the BAN vs PAK match

esakal

Updated on

Pakistan vs Bangladesh heated exchange between players: बांगलादेशकडून पहिल्या वन डेत पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला. पण, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने कडवी टक्कर दिलेली पाहायला मिळाली, परंतु त्यांना पूर्ण ५० षटकं खेळता आली नाहीत. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४७.३ षटकांत २७४ धावांत तंबूत परतला. मात्र, या सामन्यातील एका प्रसंगाने वादाला फोडणी दिली आहे. पाकिस्तानचा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सलामन अली आघा ( Salman Ali Agha) याने स्वतःलाच रन आऊट करण्यासाठी बांगलादेशचा गोलंदाज मेहिदी हसन मिराझ याला मदत केलेली पाहायला मिळाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com